थोडं बघावसं वाटतं,
थोडं पाहावंसं वाटतं,
बघता - पाहता थोडं मग हसावंसं वाटतं ..
हसता हसता हळूच मग लाजवासा वाटतं ,
लाजता लाजता थोडं मग बोलावसं वाटतं..
लाजता लाजता थोडं मग बोलावसं वाटतं ..
बोलता बोलता थोडं मग ऐकावसं वाटतं ..
बोलता बोलता थोडं मग ऐकावसं वाटतं,
ऐकता- बोलता पुन्हा मग भेटावसं वाटतं..
भेटा भेटा थोडं मन रामतंय असं वाटतं ,
रमता रमता मन मग गुंतल्य असं वाटतं ..
गुंता मनाचा हा सोडवावा असं वाटतं ..
गुपीत मनातलं हे उघडवसा वाटतं
'प्रेम आहे तुझ्यावर' हे सांगावासा वाटतं..
'माझही तुझ्यावर' हे ऐकावसं वाटतं..
No comments:
Post a Comment